यहुदी धर्म म्हणजे काय आणि यहुदी कोण आहेत?
यहुदी धर्म म्हणजे तोराहवर आधारलेली यहुदी लोकांची श्रद्धा आणि जीवनपद्धती.
यहुदी धार्मिक कायदा, म्हणजे हलाखा, यानुसार यहुदी आईच्या पोटी जन्मलेली किंवा हलाखानुसार यहुदी धर्म स्वीकारलेली व्यक्ती यहुदी आहे. विविध देशांतील यहुदी समुदायांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत.
शेमा (अनुवाद ६:४) या प्रार्थनेत एकाच निर्मात्यावरची श्रद्धा व्यक्त होते. शब्बात पाळणे, कोशेर आहार आणि गरजूंना मदत करणे ही आज्ञांच्या पालनाची उदाहरणे आहेत.